Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

प्रबोधनकार ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त अभिवादन

प्रबोधनकार ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त अभिवादन

प्रबोधनकार ठाकरे यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त विधिमंडळात अभिवादन

marathinews24.com

मुंबई – विचारवंत लेखक पत्रकार आणि समाज सुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि.१७) विधिमंडळात अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, कर्मचारीवर्ग आणि आमदार उपस्थित होते.

वरिष्ठ विधीज्ञ ॲड. सिद्धार्थ शिंदे यांचे निधन; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून श्रद्धांजली – सविस्तर बातमी 

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचा गौरव केला. समाजातील जातीयता, विषमता आणि अन्यायकारक प्रथांविरोधात त्यांनी सतत संघर्ष केला. सत्यशोधक विचारांचा पुरस्कार करून त्यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली. मानवी हक्कांचे उल्लंघन जिथे-जिथे झाले, तिथे त्यांनी आधुनिक व प्रबोधनकारी हिंदुत्वाची बाजू मांडली, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची कामे प्रभावीपणे पार पडली. “शिवसेना” हे नाव प्रबोधनकारांनीच दिले, ही ऐतिहासिक बाब त्यांनी विशेषत्वाने नमूद केली.

डॉ. गोऱ्हे यांनी राज्य सरकारने नुकताच सामाजिक न्याय विभागामार्फत मागास व इतर मागास समाजासाठी शिष्यवृत्तीत केलेली वाढ अधोरेखित केली. हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून तो म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांना दिलेले खरीखुरे अभिवादन आहे, असे त्यांनी सांगितले. प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा जपत समाजकार्यासाठी पुढेही सक्रिय राहण्याचा निर्धार डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×