डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

marathinews24.com

पुणे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), विकास प्रतिष्ठान आणि सुजाता महिला मंडळ बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ नगर, बावधन बुद्रुक येथे महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.  कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामुदायिक बुद्ध वंदना सादर केली.

महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज- डॉ. श्रीपाल सबनीस – सविस्तर बातमी 

याप्रसंगी बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अनिल विभूते, पेरीविंकल ग्रुप ऑफ स्कूल्सचे चेअरमन  राजेंद्र बांदल,माजी नगरसेवक  किरण दगडे पाटील, युवा नेते सूर्यकांत भुंडे,माजी  सरपंच   वैशाली कांबळे, रिपाइं  (आठवले) महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे संघटक  उमेश कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा, सामाजिक क्रांतीतील योगदानाचा आणि बौद्ध मूल्यांच्या प्रसारातील भूमिकेचा उल्लेख करत आपले मनोगत व्यक्त केले. सभेत सिद्धार्थ नगरमधील उपासक–उपासिका, स्थानिक नागरिक आणि बावधन परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. अभिवादन कार्यक्रमानंतर बावधनमधून शेकडो भीमसैनिक चैत्यभूमी, दादर (मुंबई) येथे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रवाना झाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×