Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

‘वंदे मातरम’ गीताचे माळेगाव बुद्रुक येथे सामूहिक गायन

'वंदे मातरम' गीताचे माळेगाव बुद्रुक येथे सामूहिक गायन

‘वंदे मातरम’ गीतास आज १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामूहिक गायन

marathinews24.com

बारामती – ‘वंदे मातरम’ गीतास आज १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत तालुका क्रीडा संकुल माळेगाव बु. येथे ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बु. यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमास तहसीलदार गणेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, प्राचार्य नितीन माने, प्रा. किशोर भोसले, बारामती औद्यागिक विकास संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, स्वयंसेवा संस्था प्रतिनिधी ओंकार तावरे, शिक्षक-कर्मचारी, विद्यार्थी उपस्थितीत होते.

पुलंनी केली परिणामकारक शब्दपेरणी – सविस्तर बातमी 

बारामती तालुक्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच ३४ शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन केले. तसेच तसेच प्रा.अंबादास मेव्हणकर यांनी आपल्या व्याख्यानात ‘वंदे मातरम गीताचा इतिहास आणि स्वातंत्र्य संग्रामातील त्याचे महत्त्व’ या विषयावर माहिती दिली. यावेळी ‘वंदे मातरम’ गायनासोबतच, विविध शाळेत सहभागी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातून निवडलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×