Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची आरास

'दगडूशेठ' गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची आरास

पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या हस्ते गुढीपूजन

marathinews24.com

पुणे – श्री गणेश नामाचा जयघोष…फुलांची आकर्षक आरास. रांगोळीच्या पायघड्या.. बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४२ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली.

मराठी न्युज24 वेब पोर्टलचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा; २० लाख वाचकांचा विश्वास – सविस्तर बातमी 

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते गणरायाची आरती करून गुढीपूजन करीत गुढी उभारण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी, विलास रासकर, गजानन धावडे, बंडू गावडे, अथर्व केदारी यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गणेशयाग, अभिषेकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, गुढीपाडव्यापासून म्हणजेच दि. १९ ते २३ मार्च पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा संगीत महोत्सव दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संगीत महोत्सवात दिग्गज कलाकारांसह युवा कलाकारांचे सादरीकरण अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि. मराठी शाळा येथे करण्यात आली आहे. संगीत महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×