गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात १० हजार १७० वाहनांची खरेदी

गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात १० हजार १७० वाहनांची खरेदी

गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात सर्वाधिक साडे सहा हजार दुचाकीं खरेदी

marathinews24

मराठी न्यूज२४ पुणे – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुण्यात तब्बल १० हजार १७० नवीन वाहनांची भर पडली आहे. आरटीओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये सर्वाधिक दुचाकींचा समावेश आहे. सर्व वाहनांची एकूण किंमत सुमारे ३०० कोटीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २ हजार ८३४ वाहनांची अधिक विक्री झाली आहे. यावर्षी शहरात ६ हजार ५१० दुचाकी आणि २ हजार २२४ चारचाकी वाहनांची खरेदी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे पुणे आरटीओ कार्यालयाने महसूल मिळवण्यात गरुडझेप घेतली आहे.

गुढीपाडवा आणि प्राचीन महत्व – सविस्तर बातमी

गुढीपाडव्याच्या मुर्हूतावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने (आरटीओ) कोट्यवधी रुपयांचा गल्ला कर स्वरूपात कमविला आहे. नागरिकांनी २८ ते ३० मार्चदरम्यान साडे सहा हजार दुचाकी आणि अडीच हजार चारचाकी वाहनांखी खरेदी केली आहे. सर्वाधिक दुचाकी वाहनांची खरेदी केल्याची नोंद आरटीओमध्ये करण्यात आली आहे. दुचाकी आणि चारचाकी विक्रीतून आरटीओने महसूल गोळा केला आहे. गुढीपाडव्याच्या सणाला वाहन खरेदी करणार्‍या नागरिकांना वेळेत वाहन उपलब्ध करुन देण्यासाठी मागील तीन दिवसांपासून वाहनांची नोंदणी करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत होते. तसेच सुटीच्या दिवशीही पुणे आणि आळंदी रस्त्यावरील मैदानात वाहनांच्या नोंदणीसाठी विशेष सोय उपलब्ध करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुढीपाडव्याच्या सणाला अधिक महसूल जमा झाला आहे. दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मागील काही महिन्यांच्या तुलनेत दुचाकी खरेदीचा आलेख सर्वाधिक उंचावला आहे. दोन्ही शहरात दिवसाला साधारणपणे दुचाकी आणि चारचाकी मिळून १ हजार १०० वाहनांची खरेदी करण्यात येत आहे. अशी नोंद आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे.

सणांच्या मुर्हूताला वाहन खरेदीचा आलेख उंचावत असतो. त्यामुळे सुटीच्या दिवशीही दसरा, दिवाळी, अक्षयतृतीया, गुढीपाडव्याला वाहनांची नोंदणी करण्याचे काम करण्यात येते. यंदाच्या गुढीपाडव्याला साडे सहा हजार दुचाकी आणि २ हजार२२४ चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाला कोटींवर महसूल जमा झाला आहे.

मनोरंजन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top