Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

मटण, चिकन विक्रेत्यांना अन्नसुरक्षेबाबत मार्गदर्शन

मटण, चिकन विक्रेत्यांना अन्नसुरक्षेबाबत मार्गदर्शन

भवानी पेठेतील कार्यशाळेत २०० अन्न व्यावसायिकांचा सहभाग; नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

marathinews24.com

पुणे – ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानांतर्गत मटण व चिकन विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षा व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून अन्न व्यावसायिकांमध्ये अन्नसुरक्षेविषयी जागरूकता वाढवून नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण मटण व चिकन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

पुण्यात आंतरराष्ट्रीय एमडी तस्करीचा पर्दाफाश – सविस्तर बातमी 

अन्न सुरक्षा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग आणि श्री. लक्ष्मीबाजार प्रतिष्ठान ट्रस्ट, भवानी पेठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. लक्ष्मीबाजार सांस्कृतिक भवन, भवानी पेठ येथे झालेल्या कार्यशाळेत परिसरातील सुमारे २०० अन्न व्यावसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यशाळेत मटण व चिकन विक्रीच्या ठिकाणी अन्नाची सुरक्षितता व स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, दुकान परिसराची स्वच्छता, कच्चे व तयार अन्न यांची योग्य हाताळणी व साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छ पाणी, उपकरणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि कीटक नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

अन्नसुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि त्याअंतर्गत नियम व विनियमांतील तरतुदींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. अन्न व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आवश्यक स्वच्छता व सुरक्षिततेच्या मानकांची अंमलबजावणी करून ग्राहकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत, असे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सहआयुक्त (अन्न) दिवाकर भोगावडे, सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके यांनी अन्न व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. अन्न सुरक्षा विषयक आवश्यक बाबी आणि कायदेशीर तरतुदींची माहितीही देण्यात आली.

अन्न व्यावसायिकांनी कार्यशाळेचे स्वागत करून ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण मटण व चिकन उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. अशा जनजागृती व मार्गदर्शन उपक्रमांमुळे अन्न व्यावसायिकांमध्ये अन्नसुरक्षेविषयी जागरूकता वाढून नागरिकांना सुरक्षित अन्न मिळण्यास मदत होणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा स्वच्छतेबाबत तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांकावर नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×