Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

मस्साजोगमध्ये ३४ लाखांचा गुटखा पकडला

दोन जण जेरबंद

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथे टेम्पोतून गुटखा विक्रीचे रॅकेट उध्वस्त केले आहे. शुक्रवारी ( दि. २६) पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास बीड ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी मस्साजोग येथे जाऊन धडक कारवाई करत ३४ लाख ४६ हजार २२७ रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहीत आसाराम देशमुख (वय ३५, रा. मस्साजोग ता. केज) आणि साहेबराव लिंबा आंधळे (वय ४५ , रा. आंधळ्याची वाडी ता. केज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईने बीड जिल्हासह केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सातबाराची प्रत देण्यासाठी लाच मागणाऱ्या ३ महिला तलाठी एसीबीच्या रडारवर – सविस्तर बातमी

मस्साजोग याठिकाणी टेम्पोद्वारे गुटखा आणण्यात येत असल्याची माहिती एलसीबी विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रात्री त्याठिकाणी टेम्पोतुन वाहून नेत असलेला ३४ लाख ४६ हजार २२७ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बटेवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, आनंत मस्के, विकास राठोड, सोमनाथ गायकवाड, अंकुश वरपे, राहूल शिंदे, अशफाक सय्यद, मनोज परझने, नितीन वडमारे, सिद्धार्थ मांजरे, सुनील राठोड यांनी केली. याकारवाईने बीडच्या खाकीची मान उंचावली आहे. पोलीस अध्यक्षक नवनीत कॉवत आणि एलसीबीतील कारवाई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्याचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×