हडपसरनजीक गावठी हातभट्टी दारुसाठा नष्ट

हडपसरनजीक गावठी हातभट्टी दारुसाठा नष्ट

वानवडी पोलिसांची गोसावी वस्ती परिसरात कारवाई

Marathi news24

मराठी न्यूज२४ पुणे – शहरातील अवैध धंद्याविरूद्ध कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर वानवडी पोलिसांकडून हद्दीत पेट्रोलिंगद्वारे संबंधिताविरूद्ध बारकाईने लक्ष देउन कारवाई केली जात आहे. अशाच एका गावठी हातभट्टी दारूसाठा नष्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे. हडपसर परिसरातील गोसावी वस्तीनजीक सुरू असलेल्या हातभट्टी उध्वस्त करीत आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून ३५ लिटर हातभट्टी भरलेली १२ कॅन, रोकड असा ४५ हजारांचा ऐवज जप्त केला. सोमनाथ संजय कांबळे (वय ३० रा. बिराजदारनगर गल्ली नं. ३ जुना म्हाडाजवळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

रमजानच्या अनुषंगाने वानवडी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सुरक्षानगर पोलीस चौकीचे कार्यक्षेत्रात गावठी हातभट्टी दारूची विक्री होत असल्याची माहिती बीटमार्शल ताकवले यांना मिळाली. त्यानुसार संबंधित मार्शलने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना माहिती देउन पथकाला पाचारण केले. सकाळी पावणेबाराच्या सुमारास परिसरातील दारूअड्डयावर छापा टाकुन आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी सोमनाथ संजय कांबळे याच्याकडील नायलॉनच्या पोत्याची पाहाणी केली. त्यावेळी त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारु मिळुन आली. चौकशीत त्याने दारु विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली.

पुणेकरांना पाणी जपून वापरा या तारखेला असणार पाणीपुरवठा बंद – सविस्तर बातमी

पोलीस पथकाने पत्र्याचे शेडमागील बाजूला पाहणी केली असता, बेडसिटखाली लपवुन ठेवलेले ३५ लिटर मापाची तयार हातभट्टी दारु भरलेली १२ कॅन मिळून आली. त्यानंतर वानवडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत ४५ हजारांचा दारूसाठा जप्त केला. आरोपीविरुध्द महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अ‍ॅक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमने, पोलीस चौकी प्रभारी अविनाश शिंदे, किशोर राणे, रुपाली ताकवले, मंगल पारधी, सोनपसारे, महेश माने यांनी केली गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक अविनाश शिंदे करीत आहेत.

मनोरंजन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top