Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Hadapsar Manjari Scholarship Exam 2026 : हडपसर-मांजरी प्रभागात २२ गुणवंत विद्यार्थी, ४५ मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान

Hadapsar Manjari Scholarship Exam 2026

मुख्याध्यापकांचाही गौरव; शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचे कौतुक

marathinews24.com

पुणे – Hadapsar Manjari Scholarship Exam 2026 : पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या हडपसर-मांजरी प्रभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या २२ गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या यशासाठी मार्गदर्शन करणाऱ्या ४५ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील असलेल्या उपक्रमशील मुख्याध्यापकांचाही गौरव करण्यात आला.

गटप्रवर्तकांच्या समायोजनाचा प्रश्न आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविणार! – सविस्तर बातमी 

शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) गोंधळेनगर, हडपसर येथील कै. रामचंद्र आप्पा बनकर इंग्रजी माध्यम विद्यालयात हा सोहळा झाला. इयत्ता चौथी, पाचवी, सातवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

यावेळी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी एम. आर. जाधव यांनी शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका लीला मोरे यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या यशाचा आढावा घेत सर्वांचे कौतुक केले. (Hadapsar Manjari Scholarship Exam 2026) आकांक्षा फाऊंडेशनचे निखिल पाटील, विनोद गोरे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण चोरमले तसेच सर्व विषयतज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, शिक्षकांच्या योगदानाची दखल घेणे आणि शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक पोपट पाटील, लविना चांदेकर, आनंदराव लकडे, विजय माने, प्रकाश खेडकर, अशोक दगडे व शिवाजी हजारे यांनी परिश्रम घेतले. संतोष जायभाये व उमेश कापरे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब लकडे यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×