Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

“बुद्धिमत्तेसोबत कठोर परिश्रमही यशासाठी तितकेच आवश्यक” : सनी निम्हण

“बुद्धिमत्तेसोबत कठोर परिश्रमही यशासाठी तितकेच आवश्यक” : सनी निम्हण

खडकीच्या सृष्टी मित्तलने सीबीएससी बोर्डात 96.6% गुण मिळवत यश संपादन केल्याबद्दल केला सन्मान

marathinews24.com

पुणे – खडकी परिसरातील सुकन्या सृष्टी मित्तल हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९६.६ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. औंध-बोपोडी प्रभागातील खडकी येथील रहिवासी असलेल्या सृष्टीने आपल्या परिश्रमातून विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्याबद्दल नगरसेवक सनी निम्हण यांनी तिचा सन्मान केला.

लेक लाडकी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ-मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील – सविस्तर बातमी

सृष्टीच्या या यशाबद्दल सनी निम्हण यांच्या “झुंज” निवासस्थानी तिची भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सनी निम्हण यांनी सांगितले की, केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही, तर त्यासोबत कठोर परिश्रम आणि यशाची प्रबळ इच्छा असणे आवश्यक असते. सृष्टीने हे आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत सृष्टी मित्तल हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×