Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

लेक लाडकी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

लेक लाडकी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील

marathinews24.com

पुणे – राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून सुरु करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेअंतर्गत जिल्ह्यात १ एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेल्या ९ हजार ४८२ मुलींना मागील तीन वर्षात ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपये लाभ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे. तसेच या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती विजेची गरज ध्यान्यात घेऊन बहृत आराखडा तयार करा – सविस्तर बातमी 

पहिला हप्ता प्रति लाभार्थी रु ५ हजार रुपयाप्रमाणे सन २०२३-२४ मध्ये १ हजार ४० मुलींना ७० लाख रुपये, सन २०२४-२५ मध्ये ५ हजार ७२० मुलींना २ कोटी ८६ लाख रुपये आणि सन २०२५-२६ मध्ये २ हजार ३६२ मुलींना १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे.

मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढवणे,मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलीचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेच्या अटी शर्ती पुढील प्रमाणे: लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. लाभार्थी बॅकेचे खाते असावे. कुंटुंबांचे वार्षिक उत्पन १ लक्ष पेक्षा जास्त नसावे. ही योजना पिवळया व केशरी शिधापत्रिकाधारक कुंटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या ए‍क अथवा दोन बालिकांसाठी लागू आहे. एक मुलगा व मुलगी असल्यास मुलीला लागू आहे.

मुलीच्या जन्मानंतर रक्क्म ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, इयत्ता सातवीत ७ हजार, इयत्ता अकरावीत ८ हजार, मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये असे मिळून १ लाख १ हजार रुपयाचा लाभ देण्यात येतो.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांनी जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासोबतच महिला सक्षमीकरणाकरिता प्रभावी योजनांची आखणी करून अंमलबजावणी करण्याचेनिर्देश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) आनंद खंडागळे यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×