Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Haveli Drought Relief Planning Meeting : हवेलीत दुष्काळ निवारण नियोजन बैठक, नाम फाऊंडेशनसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकारी उपस्थित राहणार- सभापती काकडे

Haveli Drought Relief Planning Meeting

पाणीटंचाई, शेती आणि पशुधनाच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे नियोजन; दुष्काळ निवारण आराखडा तयार होणार

marathinews24.com

पुणे – हवेली तालुक्यात निर्माण होणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारणासाठी उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) रोजी, हवेली पंचायत समिती येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आली असल्याचे, (Haveli Drought Relief Planning Meeting) हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी सांगितले. राज्यात अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, दुष्काळ निवारणासाठी आवश्यक नियोजन करून प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना राज्य शासनाकडून वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीटंचाई, शेती, पशुधन आणि ग्रामीण भागातील आवश्यक सुविधांसंदर्भात नियोजन करण्यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

बारामती येथे ४ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन – सविस्तर बातमी 

सोमवारी सकाळी ११ वाजता हवेली पंचायत समिती कार्यालयातील, महात्मा गांधी सभागृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीस नाम फाऊंडेशन, कृषी उत्पन्न बाजार समिती व बायफ संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह तालुका कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, लघुपाटबंधारे, नरेगा या विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
तसेच या बैठकीत ‘जलतारा’ या भूजल पातळी वाढवणाऱ्या, (Haveli Drought Relief Planning Meeting) राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीचे नियोजन याप्रसंगी केले जाणार आहे. यावेळी संबंधित सर्व शासकीय विभाग तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांनी आपआपल्या भागातील दुष्काळ निवारणासाठीची आवश्यक माहिती व प्रस्तावित उपाययोजनांसह बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती युवराज हिरामण काकडे यांनी केले आहे. या बैठकीतून हवेली तालुक्यातील दुष्काळ निवारण आराखडा तयार करून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने चर्चा होणार असल्याने, या बैठकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×