सराईताला विश्रामबाग पोलिसांनी केली अटक, तब्बल २० गुन्ह्यांची उकल
चोरीच्या दुचाकीवरून हिसकावित होता महिलांचे दागिने
marathinews24.com
पुणे- पोलीस असल्याची बतावणी करीत शहरासह जिल्ह्याभरात नागरिकांची लुटमार करणार्या सराईताला विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने केलेल्या तब्बल २० गुन्ह्यांची उकल करण्यात पथकाला यश मिळाले आहे. संबंधित गुन्ह्यात त्याने ३ दुचाकी, २५ लाख ७७ हजारांचे दागिने, सव्वा लाखांची रोकडची लुबाडणूक केली आहे. जफर शहाजमान ईराणी (वय ४१ रा. लोणी काळभोर, पठारे वस्ती, मूळ- बिदर कर्नाटक) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.
ड्युटीवर असलेल्या पोलिसाला केली मारहाण – सविस्तर बातमी
पोलीस असल्याची बतावणी करीत चोरट्याने महिलेकडील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची घटना शनिवार पेठेत घडली होती. मावशी मी पोलीस आहे. तुमच्या इथे चोरी झाली आहे.’ तुमच्या गळयातील गंठण व हातातील अंगठी काढुन पिशवीत ठेवा’ असे म्हणत चोरट्याने दागिने हिसकावून नेले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी उपनिरीक्षक मनोज बरुरे यांना आरोपीला शोधण्याचे आदेश दिले होते. तपास पथकाने सराईताची माहिती काढून जफर इराणीला अटक केली. ही कामगिरी उपायुक्त संदिपसिह गिल्ल, एसीपी साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, अशोक माने, मयुर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, शिवा गायकवाड, अनिस शेख, साताप्पा पाटील, संतोष शेरखाने, नितीन बाबर सागर मोरे यांनी केली.पोलीसाची बतावणी, मिनीटात दुचाकींची चोरी
आरोपी जफर इराणी हा सराईत असून, तो पोलीस असल्याची बतावणी करुन नागरिकांची लुट करीत होता. दुचाकीस्वाराला अडवून तुमच्या गाडीवर गुन्हा घडला आहे, अशा बतावणीने तो दुचाकी चोरून न्यायचा.. एखादी चांगली दुचाकी पाहिल्यानंतर त्या चालकाला अडवून, मलाही अशीच दुचाकी खरेदी करायची आहे, एक राईड आणण्यासाठी गाडी द्या, असे सांगून तो दुचाकींची चोरी करीत होता. त्यानंतर दुचाकींचे नंबर बदलून तो जबरी चोरी, दागिने हिसकाविण्याचे गुन्हे करीत होता. पोलीस असल्याची बतावणी करुन लोकांकडुन मौल्यवान सोन्याची दागिने ताब्यात घेउन पसार होत होता.
महिलेचे दागिने हिसकावून नेणार्या सराईताला तपास पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून २० गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीने पुणेशहर जिल्ह्यात चोरीचा धुडगूस घातला होता.याप्रकरणी बारकाईने तपास केला जात आहे.
विजयमाला पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे