विभागीय लोकशाही दिनात नऊ प्रकरणांवर सुनावणी

नागरिकांच्या तक्रारी जिल्हास्तरावरच सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

marathinews24.com

पुणे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आज झालेल्या विभागीय लोकशाही दिनात नऊ प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. नागरिकांच्या तक्रारी जिल्हास्तरावरच सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, तक्रारींवर गुणवत्तेने निर्णय द्यावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या.

पुणे विद्यापीठ चौकातील दुहेरी वाहतूक पूर्ववत – सविस्तर बातमी

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे तसेच विविध विभागांचे अधिकारी, तक्रारदार उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार पुढे म्हणाले, नागरिकांच्या छोट्या छोट्या तक्रारी, समस्या तालुका, जिल्हास्तरावरच समाधानकारक व न्याय्य पद्धतीने सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. असे झाल्यास त्यांना विभागीय लोकशाही दिनात तक्रार करण्याची वेळच येणार नाही व त्यांचा वेळ व पैसा वाचेल. न्यायालयीन तसेच अर्धन्यायिक प्रकरणे लोकशाही दिनाच्या कक्षेत येत नसल्याचे नागरिकांना स्पष्ट केल्यास त्यांचा वेळ अकारण वाया जाणार नाही, असेही ते म्हणाले.

विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या लोकशाही दिनात नव्याने दाखल ७ आणि मागील प्रलंबित दोन प्रकरणांचा समावेश होता. यावेळी पुणे जिल्ह्यातील ६ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तीन प्रकरणात अर्जदारांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन डॉ. पुलकुंडवार यांनी सुनावणी घेतली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×