Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

कोरेगाव पार्क’ प्रकरणात वारसदारांचे जबाब

पोलिसांनी शीतल तेजवाणीचा जबाब नोंदवला

आठ वारसदारांचे जबाब नोंद

marathinews24.com

पुणे – कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी यांची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी महार वतनातील संबंधित जमिनीच्या वारसदारांचे जबाब नोंदविले आहेत.
‘कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी यांच्याकडे दोन दिवस चौकशी करण्यात आली. शुक्रवारी या प्रकरणात १० जणांना जबाब नोंदविण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेत बोलाविण्यात आले. त्यापैकी आठ जणांनी जबाब नोंदविले’, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.

कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश – सविस्तर बातमी

कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील जमीन महार वतनाची आहे, २००६ मध्ये शीतल तेजवानी यांनी २७५ व्यक्तींकडून ही जमीन ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ करून घेतली. नंतर २०२५ ला तेजवानी हिने ‘अमेडिया’ कंपनीबरोबर करार करून ती जमीन त्यांना दिली. या जमीन प्रकरणात जूनमध्ये ताबा घेण्याचादेखील प्रयत्न झाला होता. या प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले, दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि हेमंत गवंडे यांना नोटीस देऊन चौकशीला बोलावले होते. हेमंत गवंडे यांची चौकशी झाली. तेजवानी यांची सलग दोन दिवस चौकशी झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार संचालक असलेल्या ‘अमेडिया’ कंपनीवर बोपोडी आणि मुंढवा अशा दोन ठिकाणी जमीन प्रकरणांत पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, बोपोडी जमीन येथील प्रकरणात ‘अमेडिया’ कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांचा संबंध नसल्याचे पोलिसांनी नंतर स्पष्ट केले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×