Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक

भोटे कोशी नदीच्या पुरामुळे पर्यटक अडकले; महाराष्ट्र शासनाकडून २४ तास नियंत्रण कक्ष सुरू

marathinews24.com

मुंबई – नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

माहिती नोंदवण्यासाठी लिंक:
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

नागरिकांना आवाहन

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात येत आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन: 1070 (टोल-फ्री क्रमांक)
•नियंत्रण कक्ष – 9321587143

•अधिकृत ई-मेल:

controlroom@maharashtra.gov.in

महाराष्ट्रातील नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील , तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी असे आवाहन केले आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×