Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

हुक्का पार्लरवर छापा, तिघांविरुद्ध गुन्हा

हुक्का पार्लरवर छापा, तिघांविरुद्ध गुन्हा

भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांविरुद्ध केला गुन्हा दाख

marathinews24.com

पुणे – शहरातील सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील सदनिकेत चालविण्यात येत असलेेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पात्र, तसेच सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

विवाह समारंभातून दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

सौरभ प्रकाश फडके (वय २७,रा. आसावरी कुंज अपार्टमेंट, नवले पुलाजवळ, वडगाव बुद्रुक ), प्रीतम अरुण कोयले (वय ३२, रा.. टेल्को काॅलनी, दत्तनगर, आंबेगाव, कात्रज), प्रतीक जयंत गोळे (वय ३४, रा. गुरुवार पेठ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील एका इमारतीतअ असलेल्या सदनिकेत हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक निरीक्षक गणेश माेहिते, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी ही कारवाई केली. राज्य शासनाने कमला मिल दुर्घटनेनंतर हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. बंदी घातल्यानंतर काही जण छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर चालवित असल्याचे आढळून आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×