दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारी
marathinews24.com
पुणे – जम्मू काश्मीरममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आता पोलिसांकडून हॉटेल- लॉज मालकांची झाडाझडती करण्यात येत आहे. सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली असून विविध नियमावली आणि अटींचे पालन करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल व लॉज मालकांविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश जारी केले आहेत.
पुणे : गांजा तस्करांना अटक, १३ लाखांचा ६४ किलो गांजा जप्त – सविस्तर बातमी
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल- लॉज मालकांची बैठक पार पडली. बैठकीला पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन करीत अटी- नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. दौलत लॉज, श्री लॉज, न्यू रॉयल लॉज, हर्ष लॉज, गौतम लॉज, सुयोग लॉज, साई सिद्धी लॉज, ऋतुराज लॉज, शनया इन लॉज, तत्व लॉज, रॉयल रेस्ट रूम, पृथ्वी एक्झिटिव्ह लॉज, माऊंटन हाय इन लॉज, रॉयल गार्डन रिसॉर्ट लॉज, आचल लॉज, आनंद लॉज, कोरंथीयन क्लबचे व्यवस्थापक, मालक, चालक उपस्थित होते.
लॉज आणि हॉटेल मालक-चालकांसाठी पुणे पोलिसांच्या सूचना
– लॉज येथे रहावयास येणारे सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरला नोंद घ्यावी.
– लॉज येथे राहावयास येणारे परदेशीय नागरिक यांचे सी फॉर्म भरून त्यांचे पासपोर्ट व व्हिजा यांच्या छायांकित प्रति घेऊन रजिस्टरला नोंद करावी.
– लॉज मधील सर्व कामगार वर्ग यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी.
– लॉज येथे बालकामगार कामावर ठेवू नयेत.
– लॉजचे प्रवेशद्वारावर व सभोवती येणारे जाणारे रस्ते कव्हर होतील अशा पद्धतीने एचडी व नाईट विजन कॅमेरे बसवण्यात यावेत.
– लॉज येथे आग लागली असता तात्काळ आग विझविणे करिता फायर फायटर साहित्य लावण्यात यावेत.
– लॉज येथील दर्शनी भिंतीवर आपत्कालीन नंबर लावण्यात यावेत.
– लॉज समोर वाहने पार्किंग होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
– लॉजच्या ठिकाणी संशयित आढळून आल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रूम 112 ला संपर्क करावा.