ट्रकच्या धडकेत हाॅटेल व्यवस्थापक महिलेचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार हाॅटेल व्यवस्थापक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी ट्रक चालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. वैशाली विजय गलांडे (वय ४९, रा. पुष्पराज हाऊसिंग सोसायटी, सिद्धी हाॅस्पिटलजवळ, बालाजीनगर, धनकवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ट्रक चालक विजय मेवाराम यादव (वय ४५, रा. कानपूर, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली. यशोधन गलांडे (वय २४) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

तब्बल ४६ लाख ५० हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक जाळ्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली या पुणे-सोलापूर रस्त्यावरील एका हाॅटेलमध्ये व्यवस्थापक आहेत. त्यांच्या कामाची वेळ दुपारी तीन ते रात्री बारा अशी आहे. शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) त्या नेहमीप्रमाणे दुपारी कामावर गेल्या. रात्री बाराच्या सुमारास त्यांचे काम संपल्यानंतर त्या हाॅटेलमधून घरी निघाल्या. मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास त्या पुणे-सोलापूर रस्त्याने दुचाकीवरुन घरी निघाल्या होत्या. कुमार मेडोस सोसायटीसमोर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीस्वार वैशाली यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. गलांडे यांच्या मागे मुलगा, पती असा परिवार आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांनी दिली. उपनिरीक्षक कवळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×