तब्बल ४६ लाख ५० हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक जाळ्यात

पिंपरी चिंचवड आयुक्‍तालयातील उपनिरीक्षक आर्थिक गुन्‍हे शाखेत कार्यरत

marathinews24.com

पुणे – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. प्रमोद रविंद्र चिंतामणी ( वय ४४, रा. ५०४, सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी, मुळ रा. कर्जुले हरियाळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्‍याच्‍यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात भरधाव मोटार मेट्रोच्या खांबाला धडकली, ३ तरुण ठार – सविस्तर बातमी

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वकिली करत असून, त्यांच्या अशिलाविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात आशिलाचे वडील न्यायालयीन कोठडीत आहेत. संबंधित गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेतील प्रमोद चिंतामणी याच्‍याकडे होता. गुन्ह्यामध्ये तक्रारदाराच्या आशिलाला मदत करण्यासाठी तसेच, जामिन अर्जावर पोलीस उत्तर (से ) दाखल करण्यासाठी प्रमोद चिंतामणी याने २ लाख रूपयांच्‍या लाचेची मागणी केली होती. मात्र जसजसे त्‍यांचे मोठे आर्थिक व्यवहार समजल्‍यानंतर चिंतामणी याने २ कोटी रुपयांची लाचेचा तगादा लावण्यास सुरूवात केली.

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे याप्रकरणाची तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने या प्रकरणाचा शहानिशा करून सापळा रचला. त्यानुसार रविवारी (दि. २) प्रमोद चिंतामणी हा उंटाड्या मारूती मंदिरासमोर, रास्ता पेठ येथे तक्रारदाराकडून लाचेचा पहिला हप्ता ४६ लाख ५० हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाई दरम्‍यान २ कोटी रुपयांपैकी १ कोटी हे आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला तर १ कोटी स्वत:साठी मागितल्याचे देखील एसीबीने केलेल्या पडताळणीत समोर आले आहे. ही कामगिरी एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे यांच्‍या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×