Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेला आजपासून सुरुवात

नागरिकांनी घर सुचीकरण व गृहगणनेच्या कार्यात सहकार्य करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

marathinews24.com

पुणे – भारताच्या १६ व्या जनगणनेच्या अनुषंगाने जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेच्या प्रकियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यात सक्रियपणे सहभाग घेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

चित्र व शिल्प हा देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा ठेवा – शिल्पकार विवेक खटावकर – सविस्तर बातमी

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला जिल्ह्यात १ मे २०२६ पासून सुरुवात करण्यात आली असून १५ मे २०२६ अखेर १ लाख ५३ हजार नागरिकांनी स्व-गणना केली आहे. जनगणनेच्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यासाठी आजपासून प्रगणक १४ जून २०२६ पर्यंत प्रत्येक घराला भेट देणार आहे. यावेळी प्रगणकांद्वारे गृहगणना करण्यात येणार असून नागरिकांनी आपल्याशी निगडित अचूक माहिती त्यांना द्यावी. आपल्या परिसरातील नागरिकांनाही अद्ययावत माहिती देण्यास प्रोत्साहित करावे.

घरगणनेच्या अनुषंगाने पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसह जिल्ह्यात प्रगणक आणि पर्यवेक्षकांसह सुमारे ३० हजार क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कामासाठी, भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांच्या कार्यालयाने आखून दिलेली संरचित पाच-स्तरीय प्रशिक्षण प्रणाली लागू करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. डुडी यांनी दिली आहे.

जनगणना कायदा १९४८ च्या तरतुदींनुसार राबवला जाणारा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम आहे. प्रभावी धोरण निर्मितीला पूरक ठरणारा आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणारा विश्वसनीय माहितीचा संग्रह (डेटा) निर्माण करण्यासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्यक आहे, नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×