Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

पुणे जिल्ह्यात १५ ते २० वयोगटातील मुलींच्या मोफत एचपीव्ही लसीकरणाला गती

marathinews24.com

पुणे – गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी किशोरवयीन मुलींच्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्राधान्य देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला पुणे जिल्ह्यातही गती मिळणार आहे. या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात १५ ते २० वयोगटातील मुलींच्या मोफत एचपीव्ही लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने जीविका फाउंडेशनसोबत भागीदारी केली आहे.

डीजे मुक्त गणेशोत्सवाचा ‘सोलापूर पॅटर्न’ महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकेल- सिद्धराम पाटील – सविस्तर बातमी 

राज्यातील महिलांच्या आरोग्याचे संरक्षण आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रतिबंधात्मक उपाय प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि वर्धा जिल्ह्यांनंतर पुणे जिल्ह्याचाही या उपक्रमात समावेश झाला आहे.

‘मुलींचे संरक्षण करणे हे नैतिक व सामाजिक दायित्व’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगितले आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, कॉर्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
वेळेवर तपासणी आणि एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या माध्यमातून हा आजार रोखण्यावर शासनाचा भर आहे.

पुण्यात सीएसआरच्या माध्यमातून लसीकरण

पुणे जिल्ह्यातील १५ ते २० वयोगटातील मुलींना मोफत एचपीव्ही लस उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जीविका फाउंडेशन यांच्यात भागीदारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी आणि जीविका फाउंडेशनचे चेअरमन जिग्नेश पटेल यांच्या समन्वयातून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय धोरणानुसार १४ वर्षे वयाच्या मुलींच्या लसीकरणावर शासनाचा भर आहे. त्यास पूरक म्हणून पुणे जिल्ह्यात १५ ते २० वयोगटातील मुलींचे लसीकरण सीएसआरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

आकांक्षित तालुक्यांपासून सुरुवात

या उपक्रमाची सुरुवात जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांपासून करण्यात येणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात लसीकरणाचा विस्तार करण्यात येईल. पात्र एकही मुलगी लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जीविका फाउंडेशन हे या राज्यव्यापी अभियानासाठी राज्य अंमलबजावणी भागीदार म्हणून काम करीत असून, जनजागृती, लसीकरणाची अंमलबजावणी आणि समुदाय पातळीवर विश्वास निर्माण करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सहकार्य केले जाणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×