पुण्यातील लोणी काळभोर परिसरात घडली घटना
Marathinews.com
पुणे- अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. घटनेमुळे लोणी काळभोर परिसरात खळबळ उडाली आहे. रविंद्र काळभोर (वय ४५) असे खून केलेल्या पतीचे नाव आहे. आरोपी पत्नी शोभा रविंद्र काळभोर (वय ४२) आणि प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर ( वय ४१) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील वडाळी वस्ती परिसरात रवींद्र काळभोर आणि आरोपी पत्नी शोभा काळभोर राहण्यास आहे. शोभा आणि आरोपी प्रियकर गोरख या दोघांमध्ये मागील ५ वर्षापासून प्रेमसंबंध होते. अनैतिक प्रेमसंबंधबाबत रविंद्रला समजले होते. त्यांनी पत्नी शोभाला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. तरी देखील पत्नी काही ऐकत नव्हती.ती प्रियकराला भेटण्यास जात होती. त्यावरून दोघांमध्ये अनेक वेळा भांडण झाले. सततच्या भांडणाला शोभा वैतागली होती. त्यामुळे तिने प्रियकर गोरखच्या मदतीने संपविण्याचा कट रचला. नवऱ्याला मारहाण करून कायमच अपंग करून टाकण्याचा प्लान केला. रविंद्र एकटा सापडल्यावर त्याच्यावर हल्ला करायचा, ती वेळ पत्नी शोभा आणि आरोपी गोरख हे पाहत होते. त्याच दरम्यान सोमवारी रात्री रविंद्र काळभोर हे घराबाहेर झोपले आहे. ही माहिती शोभाने प्रियकर गोरखला सांगितली. या दोघांमध्ये जवळपास चार ते पाच वेळा काल रात्री फोनवरून बोलणे झाले. त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास प्रियकर गोरखने रवींद्रच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली.त्यामध्ये अधिक रक्तस्त्राव झाल्याने, रविंद्रचा जागीच मृत्यू झाला.
असला दादला नको ग बाई म्हणत दिली सुपारी – सविस्तर बातमी
पहाटेच्या सुमारास रवींद्र काळभोर यांच्या बाजूला राहणार्या आजी झाडू मारण्यासाठी बाहेर आल्या होत्या. त्यावेळी त्यांना रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. घटनेची माहीती आजींनी आजूबाजूच्या लोकांना दिल्यावर,याबाबत पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केली होती. पण त्याच दरम्यान शोभाच्या हालचाली संशयित दिसून आल्या. पोलिसांनी शोभाकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. काही तासात आरोपी गोरख काळभोर याला ताब्यात घेऊन अटक केल्याचे लोणी काळभोर पोलिसांनी सांगितले.