Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांना मातृशोक

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांना मातृशोक

निधनाचे वृत्त समजताच ताडसोन्ना व पिंपळनेर परिसरात शोककळा

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – कर्तव्यदक्ष वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अशोक मुढे यांच्या मातोश्री आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे गुरुवारी (दि.२) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवार ( दि.३) आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांना मातृशोकबीड तालुक्यातील ताडसोन्ना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . ताडसोन्ना येथील रहिवासी आसराबाई हरिभाऊ मुंढे या धार्मिक व मनमिळावू स्वभवाच्या होत्या.

भरधाव कंटेनरची धडक; अज्ञात पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी 

अतिशय खडतर परिश्रमातून त्यांनी आपल्या दोन मुलांना उच्चशिक्षित व कलेक्टर बनवले. आसराबाई मुंढे या अंत्यंत साध्या, कष्टाळू आणि मुल्याधिष्ठीत जीवन जगणाऱ्या व्यक्ती म्हणून परिसरात परिचीत होत्या, ग्रामीण भागातील कठीण परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा संभाळ करीत, मुलामध्ये शिक्षणाची जाणीव, प्रामाणिकपणा, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचे संस्कार रुजवले. त्यांच्या संस्काराचा प्रभाव त्यांच्या मुलांच्या कामातून दिसून येतो. आसराबाई मुंढे यांचे दि.२ रोजी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच ताङसोन्ना व पिंपळनेर परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला. आसराबाई मुंढे यांच्यावर आज शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता ताडसोन्ना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सनदी अधिकारी तुकाराम मुंढे, अशोक मुंढे, बाबासाहेब मुंढे, सुना अर्चना मुंढे, संगिता मुंढे व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्याच्या जाण्याने ताडसोन्ना गावात शोककळा पसरली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×