Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

आयएफएससी एशियन के चॅम्पियनशिप 2025

आयएफएससी एशियन के चॅम्पियनशिप 2025

तिसऱ्या दिवशी भारताची सहा पदकांची कमाई

marathinews24.com

पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन (MSCA) आणि इंडियन माउंटनिअरिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयएफएससी एशियन किड्स चॅम्पियनशिप 2025’ या स्पर्धे आज तिसऱ्या दिवशी भारतीय बाल गिर्यारोहकांचा जलवा पाहायला मिळाला. भारताने तब्बल सहा पदकांची कमाई करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या दमदार कामगिरीद्वारे भारताने आशियातील बाल गिर्यारोहण क्षेत्रात नवा इतिहास रचला असून, पिंपरी चिंचवड शहराने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांसाठी एक नवे केंद्र म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

या स्पर्धेत भारताच्या आकाश सोरेन या खेळाडूने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने 13 वर्षा खालील मुलांच्या वेग (Speed) गटात सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत त्याने केवळ 8.368 सेकंदात शिखर गाठत सर्वांना चकित केले. त्याच गटातील शंकर सिंह कुंतिया याने 8.574 सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. तर मोरा बुरीउली याने कांस्यपदक पटकावले. बौल्डरिंग (Bouldering) प्रकारात  कोरियाच्या लिम सिह्युन आणि जूनह्योक को यांनी वर्चस्व राखले, तर भारताच्या शंकर सिंह कुंतिया याने दुसरे स्थान पटकावले.

भारताची ध्रुवी गणेश पाडवाल हिने तेरा वर्षा खालील मुलींच्या गटात चमकदार कामगिरी करत स्पीड (Speed) प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत तिने केवळ 10.379 सेकंदात शिखर गाठले. याच गटात मनीषा हंसदा हिने 11. 478 सेंकद वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. तर हाँग काँगच्या मॅन नोई लॅम हिने कांस्यपदक आपल्या नावावर केले.  बौल्डरिंग (Bouldering) प्रकारात कोरियाच्या किम हेउन आणि रोआ ली यांनी पहिले दोन क्रमांक मिळवले, तर इराणच्या एलीना सामी आणि भारताच्या ध्रुवी पाडवाल यांनी पहिल्या आठमध्ये स्थान मिळवता आले.

लीड (Lead) प्रकारातील 15 वर्षा खालील गटात कोरिया आणि जपानमधील खेळाडूंमध्ये तुफान स्पर्धा पाहायला मिळाली. मुलांच्या लीड प्रकारात कोरियाचा जुंगयुन चोई विजेता ठरला, तर जपानचा इट्सुकी नागाओ दुसऱ्या क्रमांकावर आला. मुलींच्या लीड प्रकारात कोरियाच्या हाबीन किम हिने सुवर्णपदक पटकावत वर्चस्व राखले, तर कोरियाच्याच नो युन सिओ हिने रौप्यपदक मिळवले आणि जपानच्या सुमिरे हिरोसे हिला कांस्यपदक मिळाले. भारताच्या वेद चव्हाण आणि अर्शिया बनू पीरसबनावर यांनीही चांगली झुंज दिली.

रात्री उशिरा पार पडलेल्या पदक वितरण समारंभात दोनदा भारताचे राष्ट्रगीत वाजवले गेले. अन् त्यासह उपस्थितांची मान अभिमानाने उंचावली गेली. तर भावना दाटून आल्याने डोळे नकळत पाणावले गेले. यामागे चुरशीने चढाई कारणाने खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि आयोजक यांची मेहनत आहे. या सहा पदकांसह भारतील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण क्षेत्रात आपली वाढती क्षमता दाखवली आहे. तसेच यामुळे MSCA च्या मिशन ऑलिंपिक्स कार्यक्रमाला या स्पर्धेच्या माध्यमातून चालना मिळाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×