Breking News
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहनशिवाजीनगरमधील हाॅटेलमध्ये देहविक्रय

पुण्यात तोतया आयपीएसचे बिंग फुटले

पोलिस आयुक्तालयात वावर; डिसीपींनाच म्हणाला मीही आयपीएस

marathinews24.com

पुणे – शहरात आयपीएस म्हणून वावरणाऱ्या एका तोतयाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.सागर वाघमोडे (रा. नेरुळ मुंबई) याला ताब्यात घेतले आहे. भावीक जितेंद्र शहा (वय.३७ ,रा. घोरपडी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ३१ ऑक्टोबरला प्रकार उघडकीस आला आहे. तोतया वाघमोडे याची पत्नी पुणे शहर पोलिस दलात अधिकारी असल्याची माहिती आहे.

लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरझडतीत सापडली ५१ लाखाची रोकड – सविस्तर बातमी

पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे पोलिस आयुक्तालयाच्या पार्किंगमध्ये थांबले होते. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्याने आयपीएस अधिकारी असून, झोन एकचे रावले साहेब माझे बँचमेट असल्याचे सांगितले. तेवढ्यात स्वतःरावले पोलिस आयुक्तालयात आले. भाजीभाकरे यांनी त्यांना संबंधीत व्यक्तीबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले सागर घोरपडे याची मला माहिती आहे. त्याच्यावर कोतवाली पोलिस ठाणे हरिद्वार उत्तराखंड येथे तोतया आयपीएस अधिकारी असल्याचा गुन्हा दाखल आहे. अशाप्रकारे पोलिस आयुक्तालयात आयपीएस अधिकारी म्हणून मिरवणाऱ्या तोतयाचे बिंग फुटले.

शहा यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. तोतया वाघमोडे आणि शहा यांचा मागील तीन चार वर्षापासून परिचय आहे. त्याने शहा यांना आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले होते. ३१ ऑक्टोबरला वाघमोडे याने शहा यांना फोन करून मेट्रो स्टेशन येथे बोलावून घेतले. त्यावेळी वाघमोडे याने शहा यांना सांगितले की, इन्कम टॅक्स कमिशनर, डिसीपी भाजीभाकरे, एसीपी संगिता आल्फान्सो हे माझ्या ओळखीचे आहेत. त्यादिवशी वाघमोडेने शहाना सोबत घेऊन महापालिका अतिरिक्त आयुक्त, एसीपी लष्कर, इनकमटॅक्स आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर दोघे दुपारी चार वाजताच्या सुमारास पोलिस आयुक्तालयात दाखल झाले.

पार्किगमध्ये डिसीपी भाजीभाकरे यांची वाघमोडे याने भेट घेऊन आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृऋषीकेश रावले माझे बॅचमेट आहेत आहेत. तेवढ्यात तेथे रावले आले. त्यांनी तोतया वाघमोडे याला ओळखले अन्‌ त्याचे बिंग फुटले. यानंतर बंडगार्डन पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी पोलिस आयुक्तालयातून वाघमोडे याला ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी सागर वाघमोडे नावाचा व्यक्ती आपण स्वतः आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून वावरत होती. पोलिस आयुक्ताल परिसरातून त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बंडगार्डन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×