Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

रक्षाबंधन सणानिमित्त बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन

कारागृह हे केवळ शिक्षेचे ठिकाण नसून ते सुधारगृह- डॉ. सुहास वारके

marathinews24.com

पुणे – बंदींच्या कलागुणांना वाव मिळावा आणि वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “रक्षाबंधन” सणाचे औचित्य साधून बंदी निर्मित वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन कारागृह व सुधारसेवा महासंचालक डॉ. सुहास वारके यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती पूजा पवार-साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. “कारागृह हे केवळ शिक्षेचे ठिकाण नसून ते सुधारगृह आहे. बंदींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे त्यांना रोजगारक्षम बनविणे आवश्यक असल्याचे मत श्री. वारके यांनी व्यक्त केले.

‘वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्रात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट – सविस्तर बातमी

“सुधारणा व पुनर्वसन” हा कारागृह विभागाचे ब्रीद असून, कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक आहे. महाराष्ट्र कारागृह उद्योगांतर्गत विविध कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जाते.

या प्रशिक्षणातून बंदींनी तयार केलेल्या या प्रदर्शनात बंदींनी तयार केलेले फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तू, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, राख्या, कपडे, हस्तमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, बेकरी पदार्थ, बिस्कीट तसेच विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कौशल्याधारित प्रशिक्षणामुळे कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्यांच्या कौशल्याच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन ते समाजात सन्मानाने जीवन जगू शकतील.” असे वारके म्हणाले.

बंदींनी तयार केलेल्या वस्तूंचे कौतुक करून, कारागृह प्रशासन व बंदींच्या सकारात्मक प्रयत्नांना समाजाने पाठबळ देण्यात येत आहे. नागरिकांनी या प्रदर्शनातून बंदी निर्मित वस्तू खरेदी करून त्यांच्या पुनर्वसनास हातभार लावावा, असे आवाहन अभिनेत्री पूजा पवार यांनी केले आहे.

यावेळी माहेर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती विद्या म्हात्रे उपस्थित होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×