Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

‘जीममध्ये गाण्यावरुन वादातून मारहाणीची घटना

बिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinewa24.com

पुणे – हडपसरमधील एका व्यायामशाळेत (जीम) गाणे लावण्यावरुन वाद झाल्याने तरुणाला डंबलने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. तरुणाच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुदस्सर रफीक सय्यद (वय २९, रा. सातववाडी, हडपसर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सूरज मुसळे, राज यांच्यासह तिघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सय्यद याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने दोघांची १३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील सातववाडीत व्यायामशाळा आहे. ६ जुलै रोजी सय्यद हा सायंकाळी सातच्या सुमारास व्यायामासाठी गेला होता. त्या वेळी व्यायामशाळेत ध्वनीवर्धकावर गाणे लावले होते. गाणे बदलल्यावरुन त्यांच्यात वाद झाला आहे. आरोपींनी सय्यद याला डंबलने मारहाण केली. त्याच्या डोक्तात तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलीस उपनिरीक्षक सलगर तपास करत आहेत.

जेधे चौकात तरुणाला मारहाण

स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चैाकात छत्रीचा धक्का लागल्याने एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. माज जमीर खान (वय १९, रा. पर्वती दर्शन) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान हा ७ जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास जेधे चौकाताली एका हाॅटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेला होता. त्या वेळी पाऊस पडत होता. छत्रीचा धक्का लागल्याने आरोपी आणि खान यांच्यात वाद झाला. आरोपींनी हाॅटेलसमोर मोटार लावली होती. आरोपींनी मोटारीतून कठीण वस्तू काढली. कठीण वस्तू खान याच्या डोक्यात घातल्याने तो जखमी झाला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×