गांजासह सराईत गुन्हेगार जेरबंद, वानवडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई
marathinews24.com
पुणे – गांजा बाळगणाऱ्या सराईताला अटक करण्यात वानवडी पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून ४ किलो गांजा, दुचाकी, मोबाईल असा ८० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. शैलेश शंकर सुर्यवंशी ( वय ३५, रा. हिंगणे मळा, हडपसर) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे त्याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील विविध भागात पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. त्यानुसार रेकॉर्डवरील टोळ्या, रायझींग गॅग, गुन्हेगार चेक केले जात आहेत. वानवडी पोलीस तपास पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व गोपाळ मदने यांना सराईत आरोपी गांजा। बाळगून असल्याची माहिती मिळाली. तो दुचाकीवरून गंगाधाम चौकातुन हडपसरकडे जात होता. तपास पथक प्रभारी धनाजी टोणे यांनी वरिष्ठांच्या परवानगीने तिथे सापळा रचला.
रामटेकडी ब्रीजवरुन आलेल्या संशयित दुचाकी चालकास बातमीदाराने दिलेल्या इशा-यावरुन अत्यंत शिताफीने जागीच पकडले. चौकशीत त्याने शैलेश शंकर सुर्यवंशी असे नाव सांगितले. त्याच्या गाडीचे डिक्कीत ६० हजार रुपये किंमतीचा ३ किलो ५८ ग्रॅम गांजा मिळून आला. आरोपीवर यापुर्वी एनडीपीएसचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हयाचा तपास उपनिरीक्षक धनाजी टोणे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, बालाजी वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.