अंमली पदार्थ विरोधी पथक एकची कामगिरी
marathinews24.com
पुणे – मेफेड्रोन विक्री करणारे सराईत जेरबंद – मेफेड्रॉनची विक्री करणार्या सराईत आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकला यश आले आहे. त्यांच्याकडून तब्बल १५ लाख ८४ हजारांचा अमली पदार्थ साठा जप्त केला आहे. मोहमद जारुन शेख (वय २७ रा. सिध्दी विनायक वैभव पांडवनगर, वडाची वाडी रोड, उंड्री) सॅम्युअल बाळासाहेब प्रताप (वय २८ रा. फ्लॅट नं ०४, आंबेडकर बिल्डींग हिंगणे खुर्द ) आणि अनिकेत विठ्ठल कुडले (वय २७ रा. ओम नम शिवाय अर्पाटमेंट नारायण पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सोन्याचा हंडा देण्याची बतावणी, महिलेला गंडा घालणार्या भोंदूला बेड्या – सविस्तर बातमी
अंमली पदार्थ विरोधी पथक एक १५ जुलैला बिबवेवाडीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मोटारीत रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत कुडले व मोहम्मद शेख साथीदारांसह मिळून आले. शेखकडून ५ लाख ६ हजारांचे २५ ग्रॅम एमडी, ७० हजारांचे दोन मोबाइल जप्त केले. आरोपी प्रतापला ताब्यात घेउन ६ लाख ८८ हजारांचे ३१ ग्रॅम एमडी ५० हजारांचा मोबाइल जप्त केला. आरोपी अनिकेत कुडले याच्याकडून ३ लाखांची मोटार आणि मोबाइल जप्त केला. तिघांकडून १५ लाख ८५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
ही कामगिरी अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेन्द्र मुळीक, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, एपीआय अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, संदिप शिर्वेâ, विनायक साळवे, मारुती पारधी, दयानंद तेलंगे, सर्जेराव सरगर, नागनाथ राख, नितिन जाधव, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, सुहास डोंगरे, विपुन गायकवाड, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, स्वप्नील मिसाळ यांनी केली.