अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी मारला डल्ला
marathinews24.com
पुणे– स्टॉक ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल २८ लाख ४० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३१ जानेवारी ते २४ एप्रिल २०२४ कालावधीत वडगाव शेरीत घडली आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय नागरिकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पिस्तुलाचा धाकाने पिता-पुत्राला जिवे मारण्याची धमकी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वडगाव शेरीत राहायला असून, ३१ जानेवारी २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. स्टॉक ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादित केला. खाते उघडण्यास भाग पाडून त्यांना किरकोळ स्वरूपात नफा ऑनलाईनरित्या वर्ग करून दिला.
त्यामुळे तक्रारदाराचा विश्वास संपादित झाल्यानंतर त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. तीन महिन्यांत जवळपास २८ लाख ४० हजारांची ऑनलाईन रक्कम गुुंतवणूक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधिताला फोन करून रक्कम माघारी देण्याची मागणी केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांचा संपर्क बंद केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करीत आहेत.