Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

खोटे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक; कर्नाटकातून महिलेला अटक

खोटे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक;कर्नाटकातून महिलेला अटक

१०० कोटींपर्यंतच्या गुंतवणुकीचे आमिष

marathinews24.com

पुणे – जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी कर्नाटकातील बेळगाव येथून अटक केली. राजश्री राजेश तुडयेकर (वय ४२, रा. बेळगाव) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग’ या नावाने कंपनीचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. या कंपनीत एक लाख रुपयांपासून पुढे तब्बल १०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक स्वीकारल्या जात होती. गुंतवणूकदारांनी दिलेल्या रकमेपैकी ३० टक्के रक्कम शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवून उर्वरित ७० टक्के रक्कम सुरक्षित ठेवली जात असल्याचे सांगण्यात येत होते. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतविलेल्या रकमेवर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले जात होते.

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक – सविस्तर बातमी 

आमिषाला बळी पडून अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीत पैसे गुंतवले. त्यानंतर आर्थिक फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी राजश्री तुडयेकर हिच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपी महिलेने अनेक गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे खोटे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी बेळगाव येथून तिला ताब्यात घेऊन अटक केली. १० ऑगस्टपासून ती न्यायालयीन कोठडीत असून, सध्या तिची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

प्रकरणातील फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याचे तपासात समोर आले असून, रॉयल ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केलेल्या इतर गुंतवणूकदारांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी केले आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलिस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्यासह पोलिस पथकाने केली.

तरुणाकडून पिस्तूल, काडतुसे जप्त

कोथरूड परिसरात पोलिसांनी तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. प्रेम देवेंद्र साळुंखे (वय १९, रा. म्हसोबा चौक, दत्तवाडी) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी शिवप्रसाद दहीफळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रेम साळुंखे याच्या विरोधात बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

केळेवाडी परिसरातील कुमार प्रॉपर्टीजच्या मोकळ्या जागेजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडे कोणतीही परवानगी नसताना देशी पिस्तूल आणि काडतुसे आढळून आली. जप्त केलेल्या पिस्तुलाची किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. हे पिस्तूल आरोपीकडे कुठून आले आणि ते बाळगण्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×