Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक

कात्रजमधील जमीन गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून फसणूक

marathinews24.com

पुणे – जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने चौघांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत एका व्यावसायिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आदित्य भारत गायकवाड (वय ३३, रा. सुनीतानगर, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

डिझायनिंग अभ्यासक्रमात प्रवेशाच्या आमिषाने ७० विद्यार्थ्यांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४३ वर्षीय व्यावसायिक मूळचे नागपूरचे आहेत. आरोपीशी त्यांची जुलै २०२३ मध्ये ओळख झाली हाेती. पुण्यातील कात्रज भागात जमीन खरेदीत गुंतवणूक केल्यास दरमहा चांगला परतावा देईल, असे आमिष आरोपीने त्यांना दाखविले. त्यानंतर नागपूरमधील व्यावसायिकसह त्यांच्या परिचितांनी आरोपीकडे अडीच कोटी रुपयांची रक्कम गुंतविली. आरोपीकडे गुंतवणुकीस रक्कम दिल्यानंतर सुरुवातीला त्यांना परतावा दिला.त्यानंतर आरोपीने त्यांना परतावा देणे थांबविले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे तपास करत आहेत.

जमीन विक्रीचे आमिष दाखवून ३२ लाखांची फसवणूक

सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी परिसरातील एक भूखंड विक्रीचे आमिष दाखवून एकाची ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमनाथ तानाजी रजपूत, गणेश बाबूराव गरूड (दोघे रा. नांदेड सिटी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार हे नांदेड सिटी परिसरात राहायला आहेत.

नांदेड सिटी परिसरातील एक भूखंड विक्री करायचे असल्याचे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते. भूखंड विक्रीचा व्यवहार एक काेटी ४० लाख रुपयांना ठरला होता. पहिला हप्ता म्हणून आरोपींनी तक्रारदाराकडून ३२ लाख रुपये घेतले. त्यांना भूखंड विक्री व्यवहारास मान्यता मिळाल्याचे बनावट पत्र दिले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रादाराने नुकतीच फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक परदेशी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×