Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

आयपीओची गुंतवणूक पडली महागात, तब्बल ३८ लाखांची फसवणूक

जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांचा डल्ला 

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये ट्रेडींगसह आयपीओत गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल ३८ लाख २४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर कालावधीत खडक परिसरातील टिंबर मर्चंट कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी ५१ वर्षीय तक्रारदाराने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आई मरीमाता मंदीरात बसलोय… बिगबॉस विजेता सूरजचे अश्रू थांबेनात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे टिंबर मर्चंट कॉलनीत राहायला असून, ३ नोव्हेंबर २०२४ ला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. त्यांच्यासोबत संवाद साधून ऑनलाईनरित्या अ‍ॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना शेअर मार्वेâटसह आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी केली. जेवढी जास्त रक्कम गुंतवणूक कराल, तेवढा नफा जास्त मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले.

त्यानुसार तक्रारदाराने रक्कम गुंतवणूकीला सुरूवात केली. तब्बल ३८ लाख २४ हजार रुपये जमा केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधिताला फोन करून विचारणा केली असता, त्यांनी टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×