Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

‌‘काही प्रॉब्लेम ये का?‌’ एकांकिकेने मारली बाजी

हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने (हडपसर) सादर केलेल्या काही प्रॉब्लेम ये का? एकांकिकेने बाजी मारत हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला ५ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेले जयराम हर्डीकर स्मृतिचिन्हासाठी यावर्षी एकही एकांकिका पात्र ठरलेली नाही.

आसमंती भिनला, दाही दिशा घुमला… ‘शंभुराजे शंभुराजे’ जयघोष – सविस्तर बातमी

स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक आणि ३ हजार रुपयांचे रोख पारितोषिक वामन आख्यान (मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड) एकांकिकेने तर सांघिक तृतीय पारितोषिक संजीव करंडक आणि २ हजार रुपयांचे पारितोषिक आतल्या गाठी (सर परशुरामभाऊ महाविद्यालय) या एकांकिकेला जाहीर करण्यात आला.

हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार (दि. 13) आणि रविवारी (दि. 14) भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहोचलेल्या नऊ संघाचे तीन सत्रात सादरीकरण झाले. स्पर्धेचा निकाल रविवारी (दि. 14) रात्री जाहीर करण्यात आला. योगेश सोमण, अश्विनी गिरी, प्रदीप वैद्य यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

सांघिक प्रथम

– काही प्रॉब्लेम ये का? (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर)

सांघिक द्वितीय –

– वामन आख्यान (मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)

सांघिक तृतीय –

– आतल्या गाठी (सर परशुरामभाऊ महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका-पारितोषिक दिलेले नाही

सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक

अथर्व किरवे, क्षितिज दीक्षित (कोयता, पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय)

सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक -सोहम कुलकर्णी, इश्वरी जोशी (हॅपी बर्थडे कप केक, फर्ग्युसन महाविद्यालय, स्वायत्त)

उत्तेजनार्थ विद्यार्थी लेखिका- अपूर्वा काळपुंड (पिसाळा, न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स, सायन्स कॉलेज)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

आस्था काळे (काही प्राब्लॅम ये का?, अण्णासाहेब मगर कॉलेज, हडपसर)

उत्तेजनार्थ दिग्दर्शन –

(अंतिम फेरी) : अनिकेत खरात, विराज दिघे (वामन आख्यान, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)

उत्तेजनार्थ दिग्दर्शन- (अंतिम फेरी) – अद्वय पूरकर, शाश्वती वझे, समर्थ खळदकर (आतल्या गाठी, सर परशुराम भाऊ महाविद्यालय) सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य – पारितोषिक दिलेले नाही

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×