अभय प्रभावना म्युझियमला भेट देण्याचे आवाहन
marathinews24.com
पुणे – जैन धर्माने नेहमीच अहिंसा शिकविली – उद्योजक अभय फिरोदिया : हिंदुस्थानला मोठी प्राचीन संस्कृतीची पंरपरा लाभली असून, त्याद्वारे प्रत्येक धर्माकडून विविध मूल्य लोकांपर्यंत पोहोचविले जात आहे. त्याचाच भाग म्हणजे पूजा-अर्चा करणे, देव-दर्शनासाठी मंदीरात जाणे असून, प्रत्येक धर्माची मांडणी फक्त वेगवेगळी आहे. जैन धर्माने नेहमीच अिंहसा शिकविली असून, याबाबतची सचित्र माहिती आम्ही अभय प्रभावना म्युझियमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. सुमारे ६०० एकरात उभारलेल्या म्युझियमला भेट द्यावी, असे आवाहन प्रसिद्ध उद्योजक अभय फिरोदिया यांनी केले आहे. अभय प्रभावनाची माहिती घेतल्यानंतर देशभरातून आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिंधीसोबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोळोसे गावात कृषी दिन उत्साहात साजरा! – सविस्तर बातमी
उद्योजक फिरोदिया म्हणाले, अभय प्रभावना म्युझिमच्या माध्यमातून आम्ही एक चांगला प्रयोग केला आहे. तब्बल १२ वर्ष संग्रहालयाचे कामकाज सुरू होते. त्यासाठी अनेकांनी सहकार्य केले असून, कामकाजावेळी आम्हाला प्रचंड संघर्षही करावा लागला. मात्र, आता जवळपास म्युझियम पाहण्याजोगे बनविण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील पारवडी याठिकाणी इंद्रायणी काठावर म्युझियमची उभारणी केली आहे. म्युझियममध्ये आम्ही कोणत्याही प्राचीन वस्तू ठेवल्या नाहीत. मात्र, अत्याधुनिक तंत्रसामुग्रीचा वापर करून चलचित्रासह माहितीचा संग्रह दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील प्रत्येक भागात असलेल्या देव-देविकांच्या मुर्तींसह मंदीराची मांडणी केली आहे. संपुर्ण म्युझिम पाहिल्यानंतर हिंदुस्थानातील आधारभूत मूल्यांची माहिती होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान विविधांगी बदलाकडे जात असून, आपण आपले सांस्कृतिक मूळ विसरता कामा नये. विशेषतः संस्कृती, इतिहास, धर्म, प्राचीन आणि वर्तमान काळात झालेले बदलांशी सांगड घालून, विचारांची देवाण-घेवाण कायमस्वरूपी जतन करणे आवश्यक आहे. यासाठी तरूणांनी पुढे आले पाहिजे. अभय प्रभावणा म्युझिमच्या माध्यमातून जैन धर्मासह प्राचीन काळातील मंदीरांच्या मांडणीची पाहणी करण्यासाठी माता-भगिनींनी प्राधान्य द्यावे. आपल्या मुलांना म्युझियम दाखवून त्यांच्यावरील संस्कार द्विगुणीत झाल्यास समाज वाढण्यास मदत होणार आहे. तब्बल ४५० कोटी रूपयांहून अधिक रकमेतून म्युझिमची उभारणी केली आहे. मात्र, देश, समाज स्वातंत्र्यासाठी जैन धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे जगले पाहिजे. तसेच वागलेही पाहिजे असेही उद्योजक अभय फिरोदिया यांनी स्पष्ट केले.