Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ७ लाखांचे दागिने लंपास

पोलीस चौकीत राडा; तिघांविरुद्ध गुन्हा

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा ६ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ब्युटी पार्लरमध्ये कामाच्या आमिषाने तरुणींकडून वेश्याव्यवसाय – सविस्तर बातमी

तक्रारदार महिला मूळच्या नवी मुंबईच्या आहेत. त्या ९ ऑक्टोबरला सकाळी एसटी बसमधून निघाल्या होत्या. हडपसर भागातील मगरपट्टा सिटी ते वडगाव शेरी दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून दोन हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा सहा लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पिशवीतून ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविले

पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून एक लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना बंडगार्डन रस्त्यावर घडली. याबाबत एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पर्वती भागात राहायला आहेत. त्या शुक्रवारी (१० ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बंडगार्डन रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×