चोरट्यांनी ४० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावली
marathinews24.com
पुणे – पत्नीसमवेत रस्त्यावर उभे असलेल्या व्यक्तीची दुचाकीस्वार चोरट्यांनी ४० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना डेक्कन परिसरात घडली. यप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिरुद्ध जगन्नाथ मित्रगोत्री (वय ४९, रा. रामकृष्ण परमिट, प्रभात रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
रिक्षाच्या भाडेकरूमुळे दोघेजण भिडले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीुसार, अनिरुद्ध हे २१ एप्रिलला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पत्नीसोबत जंगली महाराज रस्त्यावरील मोची दुकानासमोर उभे होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ही घटना अचानक घडल्याने मित्रगोत्री यांनी तत्काळ डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.