Breking News
दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती

मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती

महाराष्ट्राच्या विकासासाठी धोरणात्मक बळकटी

marathinews24.com

पुणे – मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांची राज्य सरकारच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.
धवसे यांच्यावर आता चार प्रमुख क्षेत्रांमध्ये राज्याच्या धोरणात्मक वाटचालीसाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये गुंतवणूक प्रोत्साहन व धोरण निर्माण, थेट विदेशी गुंतवणूक सुलभीकरण, पायाभूत प्रकल्पांचे ‘वॉर रूम’ समन्वय आणि मोठ्या प्रमाणातील आयटी उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी धोरणात्मक बळकटी

धवसे यांची ही नियुक्ती राज्य सरकारच्या जागतिक गुंतवणूक आकर्षण, वेगवान पायाभूत प्रकल्प राबविणे व डिजिटल युगातील प्रशासकीय रूपांतरणासाठीचे प्रयत्न अधिक गतिमान करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या धोरण मंडळातील विश्वासू सदस्य असलेल्या धवसे यांची नियुक्ती राज्याच्या आर्थिक विकासाला नवे आयाम देण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जागतिक स्तरावरील धोरणात्मक अनुभव

धवसे यांना दोन दशकांहून अधिक काळ स्ट्रॅटेजी, कन्सल्टिंग व टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अनुभव असून, त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे. मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी एस. पी. जैन व्यवस्थापन संस्था येथून एमबीए ही पदवी प्राप्त केली. तसेच हार्वर्ड विद्यापीठाच्या जॉन एफ. केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. राज्याच्या आर्थिक व्हिजनला जागतिक गुंतवणूक प्रवाहाशी सुसंगत करण्यासाठी व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी धवसे यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले.

नवी जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जागतिक भागीदारी, धोरणात्मक गुंतवणूक आणि परिवर्तनशील आयटी प्रकल्प राबविण्यास मी कटिबद्ध आहे. या जबाबदारीबद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.- कौस्तुभ धवसे,
मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक व धोरण)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top