अपघातानंतर चालक पसार
marathinews24.com
पुणे – टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना खडकवासला परिसरात घडली. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.कलफ शाबीर हुसेन (वय २६, सध्या रा. न्यू कोपरे गाव, एनडीए रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत हुसेन याचा पुतण्या मोहम्मद गोली साह (वय १९, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. रन्नुडी लालपूर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) याने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
किरकोळ वादातून रखवालदारावर चाकूने वार – सविस्तर बातमी
पोलसिांनी दिलेल्या माहितीनुसार, साह आणि त्याचा चुलत काका हुसेन हे मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. दुचाकीस्वार हुसेन हा ८ ऑगस्ट राेजी दुपारी साडेतीनच्या सुमारास खडकवासला परिसरातून निघाला होता. डीआयटी संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार हुसेन याला धडक दिली. अपघातात तो गंभीर झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता टेम्पाचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या हुसेन याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे तपास करत आहेत.
























