पुण्यात खासगी कार्यालयात चोरी, साडेपाच लाखांची रोकड लंपास

खाजगी कार्यालयातून साडेपाच लाखांची रोकड चोरीला
marathinews24

पुणे – खासगी कार्यालयातून साडेपाच लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरात घडली.
याबाबत राजीव विश्वेश पटेल (वय ६८, न्याती हायलँडस, महंमदवाडी, हडपसर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पटेल हे व्यावसायिक असून लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील सोसायटीत त्यांचे कार्यालय आहे. कार्यालयीन कामासाठी त्यांनी साडेपाच लाख रुपयांची रोकड ठेवली होती. चोरट्याने कार्यालयातील खिडकीची काच सरकवून आत प्रवेश केला. लाकडी कप्पा उचकटून रोकड चोरून चोरटा पसार झाला. सोमवारी दुपारी रोकड चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने तरुणाचा अपघाती मृत्यू – सविस्तर बातमी
पटेल यांच्या कार्यालयात चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top