Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

पैशासाठी पोलीस असल्याचा बनाव करून अपहरण

अरण्येश्वरमध्ये तरूणावर वार, एकाला अटक

लोहगाव पोलिसांच्या समयसूचकतेमुळे गंभीर प्रकार टळला

marathinews24.com

पुणे – पोलीस असल्याचे भासवून तरुणाचे अपहरण करून मारहाण करत पैशांची मागणी करणाऱ्या ८ जणांच्या टोळीविरुद्ध लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, लोहगाव पोलिसांनी दाखविलेल्या समय सूचकतेमुळे संभाव्य गंभीर प्रकार टळला. याप्रकरणी किरण उनवणे (रा. बोल्‍हेगाव, जि. अहिल्यानगर) हिच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप शंकर डोंगरे (वय ३४, रा. मोझेनगर, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मोझेनगर येथील साई कृपा बिल्डिंग तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील बोल्हेगाव येथे घडला.

प्रेम, धमक्या अन आत्‍महत्‍या; फाटलेल्या चिठ्ठीतून उलगडला महिलेवरील अन्याय – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप डोंगरे हे २३ फेब्रुवारीला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास त्यांच्या मोझेनगर येथील घरी होते. त्यावेळी ५ व्यक्ती त्यांच्या घरी आले. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत डोंगरे यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मोबाईल ताब्यात घेत बळजबरीने कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. आरोपींनी त्यांना लोहगाव येथील सृष्टी हॉटेलच्या मागील बाजूस नेऊन पुन्हा मारहाण केली.

आरोपी किरण उनवणे हिनेही मारहाण करत डोंगरे यांना कारमध्ये बसण्यास भाग पाडले. कमरेला लावलेल्या पिस्तुलाचा धाक दाखवत, संबंधित महिलांचे पैसे दिले नाहीस तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर आरोपींनी डोंगरे यांना बोल्‍हेगाव येथे नेले. तेथेही त्यांना मारहाण करून पैशांसाठी तगादा लावण्यात आला. “पैसे दिले नाहीत तर तुझा गेम करून टाकेन,” अशी धमकीही देण्यात आली. या प्रकारातून सुटका झाल्यानंतर डोंगरे यांनी लोहगाव पोलिस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा पाटील यांच्‍या मार्गदर्शनात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींच्‍या शोधासाठी पथक रवाना केले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा पाटील यांनी सांगितले, प्राथमिक चौकशीत डोंगरे हे मूळचे अहिल्यानगर येथील असून त्यांनी शिलाई मशीन देण्याच्या नावाखाली काही महिलांकडून लाखो रुपये गोळा केल्याची माहिती समोर आली. मात्र मशीन न देता ते पुण्यात आले होते. डोंगरे यांच्या अपहरणाची माहिती शेजाऱ्यांनी आधीच पोलिसांना दिली होती. मात्र घरी परतल्यानंतर डोंगरे यांनी अपहरण झाले नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणाचा पुढील तपास लोहगाव पोलिस करीत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचा एक नातेवाईक अहिल्यानगर येथील स्थानिक नगरसेवक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×