Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

प्रेम, धमक्या अन आत्‍महत्‍या; फाटलेल्या चिठ्ठीतून उलगडला महिलेवरील अन्याय

प्रेम, धमक्या अन आत्‍महत्‍या; फाटलेल्या चिठ्ठीतून उलगडला महिलेवरील अन्याय

ब्लॅकमेलिंग करणाऱ्यावर गुन्‍हा दाखल

marathinews24.com

पुणे – डस्टबिनमध्ये फाडून टाकलेल्या कागदाचे कपटे जोडताच विवाहितेच्या आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. ब्लॅकमेलिंग केल्यामुळे तिने आत्‍महत्‍येचे पाऊल उचलल्‍याचे समोर आहे आहे. जुनी छायाचित्र व्हायल होण्याच्‍या भितीने व मानसिक छळ केल्यामुळे त्रस्त झालेल्या २७ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंदननगर परिसरात घडली. याप्रकरणी करण शिंदे विरूध्द गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. रेखा नाव बदललेले (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या भावाने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गांजा अन पिस्‍तुल बाळगणाऱ्या एकाला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखाचे लग्न २०१६ साली झाले होते. तिला एक मुलगा आहे. ती पुण्यात कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. आरोपी करण शिंदे हा रेखाच्या पतीचा मित्र असून सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान तो त्यांच्या घरी वास्तव्यास होता. याच काळात त्याने रेखाला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाले. त्यानंतर करणला घराबाहेर काढण्यात आले. दरम्यान काही काळानंतर पती-पत्नी पुन्हा एकत्र राहू लागले. मात्र रेखा आणि करण संपर्कात पुन्हा आल्याने दोघांमध्ये वाद वाढले. सप्टेंबर २०२५ मध्ये रेखा मुलासह माहेरी राहू लागली.

रेखाला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. तिने करणशी संबंध तोडून पुन्हा संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र करण तिला तसे करू देत नव्हता. जुने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो पैशांची मागणी करत होता. सततच्या धमक्यांमुळे आणि मानसिक तणावामुळे रेखा नैराश्यात गेली होती. ९ फेब्रुवारीला रात्री आठच्या सुमारास तिने घरात एकटी असताना गळफास घेतला. दरवाजा न उघडल्याने नातेवाईकांनी दरवाजा तोडला असता ती मृतावस्थेत आढळली. या आत्‍महत्‍येचा तपास चंदननगर पोलिस करत असतानाच तपासादरम्यान पोलिसांच्‍या हाती महत्‍वपूर्ण पुरावा लागला. ऑफीसमध्ये जाऊन तपासणी करत असताना ती ज्‍या ठिकाणी स्वागतिका म्‍हणून काम करत होती. त्‍या तिच्या ऑफीसमधील डस्टबिनमध्ये फाडलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली.

पोलिसांनी पारदर्शक टेपच्या मदतीने ती जोडून वाचली. त्यावेळी ब्लॅकमेलिंगचा संपूर्ण प्रकार उघड झाला. सुसाईड नोटमध्ये तिने करण शिंदे सातत्याने धमक्या देत असल्याचे, पैशांची मागणी करत असल्याचे नमूद केले होते. तसेच मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग आणि व्यवहारांचे पुरावे असल्याचेही लिहिले आहे. सुसाइड नोट व इतर पुराव्यांच्या आधारे चंदननगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×