Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

गांजा अन पिस्‍तुल बाळगणाऱ्या एकाला अटक

सनसिटी रस्त्यावर तरुणाच्या खून प्रकरणी ३ अल्पवयीन ताब्यात

गुन्‍हे शाखेच्‍या युनिट पाचची कारवाई

marathinews24.com

पुणे – बेकायदेशिररित्‍या गांजा विक्री करत असलेल्‍या एकाला गुन्‍हे शाखेच्‍या युनिट पाचने मांजरी येथील लक्ष्मी कॉलनी समोरील रोडवरून ताब्यात घेतले. त्‍याच्‍याकडे केलेल्‍या चौकशीत 1 किलो 820 ग्रॅम गांजा जप्‍त करण्यात आला. त्‍याची अधिक चौकशी करण्यात आली असता त्‍याच्‍याकडे गावठी बनावटीचे पिस्‍तुल जप्‍त करण्यात आले आहे. संतोष शंकर गुंजाळ (29, रा. गंगानगर, फुरसुंगी मुळ रा. केशव गार्डन सोसायटी जवळ, माळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्‍याचे नाव आहे. पोलिस अमंलदार अमित कांबळे यांनी मांजरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी 

गुन्‍हे शाखेच्‍या युनिट पाचचे कर्मचारी दि. 23 फेब्रुवारीला सायंकाळच्‍या सुमारास हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकातील एकाला मांजरी येथील एंजल स्‍कुलच्‍या मागे कोणीतरी गांजा विकत असल्‍याची माहिती मिळाली. मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे गांजा विक्रेत्‍याला ताब्यात घेतले असता त्‍याच्‍याकडून 35 हजारांचा सुमारे दोन किलो गांजा जप्‍त केला. संतोष गुंजाळ याने त्‍याच्‍याजवळी पिस्‍तुलही पोलिसांना काढून दिले. पुढील तपास मांजरी पोलिस करत आहे.

पिस्‍तुल बाळगणाऱ्या अटक

बेकायदेशिररित्‍या पिस्‍तुल बाळगणाऱ्या एकाला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्‍याच्‍याकडून 20 हजार रूपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्‍तुल आणि एक जिवंत काडतुस जप्‍त करण्यात आले. राज किशोर दावणे (23, रा. दांडेकर पुल, सिंहगडरोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्‍याचे नाव आहे. त्‍याला औध बाणेर रोडवरील व्‍हाईट हाऊस हॉटेलच्‍या भिंती जवळून ताब्यात घेण्यात आले. त्‍याची तपासणी केली असता त्‍याच्‍याकडे हे गावठी बनावटीचे पिस्‍तुल सापडले. दि. 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्‍या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिस अमंलदार वाघेश कांबळे यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×