Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक

चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाकडे मदतीचा बहाणा करुन चोरट्याने ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुंतवणूकीच्या आमिषाने १५ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे पाषाण-सूस रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. गेल्या महिन्यात ते एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी एटीएमच्या आवारात चोरटा थांबला होता. ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले. त्यांच्या पाठाेपाठ चोरटा एटीएममध्ये गेला. ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणा केला. चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्डचा वापर पैसे काढण्यासाठी केला. हातचलाखी करुन ज्येष्ठाकडील एटीएम कार्ड चोरट्याने स्वत:कडे ठेवले. एटीएममध्यचे तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी करुन चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्ड ज्येष्ठ नागरिकाला दिले. एटीएम कार्ड, सांकेतिक शब्दाचा वापर करुन त्याने बँक खात्यातून ८० हजार रुपये चोरले. सहायक पोलीस निरीक्षक सानप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×