Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

कोरेगाव पार्क, बोपोडी जमीन व्यवहाराचा तपास आथिक गुन्हे शाखेकडे

शीतल तेजवानीने परदेशात पलायन केल्याची चर्चा

marathinews24.com

पुणे – शहरातील कोरेगाव पार्क आणि बोपोडीतील जमीन व्यवहार प्रकरणांतील कुलमुखत्यारधारक शीतल किसनचंद तेजवानी हिने परदेशात पलायन केल्याची चर्चा आहे. मात्र, तेजवानी पसार झाल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. या दोन्ही प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील गुंडाला अटक – सविस्तर बातमी

कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या ‘अमोडिया’ कंपनीचा बोपोडीतील आणखी एक जमीन व्यवहार उघडकीस आला.

बोपोडी आणि कोरेगाव पार्क या दोन्ही प्रकरणांत तेजवानी हिच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस तिचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप ती पोलिसांच्या हाती सापडलेली नाही. तिने परदेशात पलायन केल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही.

हे प्रकरण फसवणुकीचे आहे. फसवणूक, अपहार प्रकरणात आरोपी अटकपूर्व जामीन मिळवू शकतात. या प्रकरणांतील तेजवानी ही परदेशात पसार झाल्याची चर्चा आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळालेली नाही,असे आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

संबंधित जमीन गैरव्यवहार प्रकरणांचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणांतील कागदपत्रे शासकीय विभागाकडून मागविण्यात आली आहे. कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे’ अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×