Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

एन्काउंटरच्या भीतीने कृष्णा आंदेकर पुणे पोलिसांना शरण

एन्काउंटरच्या भीतीने कृष्णा आंदेकर पुणे पोलिसांना शरण

आयुष कोमकर खुन प्रकरण, १३ आरोपींना बेड्या

marathinews24.com

पुणे – महाविद्यालयीन तरूणाचा खून घडवून आणणार्‍या आंदेकर टोळीतील पसार आरोपी कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण आला आहे. मुलाची माहिती दे, नाहीतर त्याचा एन्काउंटर करू अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप कुख्यात बंडू आंदेकर याने न्यायालयात केला होता. त्यानंतर घाबरलेल्या कृष्णाने एन्काउंटरच्या धास्तीने थेट समर्थ पोलीस ठाणे गाठून पोलिसांसमोर हजेरी लावली. फरार कालावधीत त्याला कोणी मदत केली, याचा शोध पोलीस घेत आहे. पुढील तपासासाठी समर्थ पोलिसांनी त्याला गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे.

घोरपडे पेठेतील घरातून ५५ हजारांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुष गणेश कोमकर (वय १९ रा. नाना पेठ) याच्यावर पिस्तूलातील गोळ्याचा वर्षांव करीत हत्या केली. ५ सप्टेंबरला इमारतीच्या पार्विंâगमध्ये दुचाकी उभी करीत असताना दबा धरून बसलेल्या दोघांनी त्याच्यावर ११ गोळ्या झाडल्या होत्या. पुणे पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. दरम्यान, खून प्रकरणातील बहुतांश आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. तपासाअंती जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधितांना ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, एसीपी शंकर कटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर, अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९) आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०, सर्व रा. नानापेठ), टोळीचा म्होरक्या सूर्यकांत बंडू अण्णा आंदेकर (वय ७०), तुषार नीलंजय वाडेकर (वय २७), स्वराज नीलंजय वाडेकर (वय २३), वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय ४०), अमन युसुफ पठाण (वय २५, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुलू मेरगु (वय २०, भवानी पेठ), यश सिद्धेश्वर पाटील (वय १९) आणि अमित प्रकाश पाटोळे (वय १९, दोघेही रा. नाना पेठ) कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

एन्काउंटरच्या भीतीने कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण

आयुष कोमकर हत्या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीला सोमवारी (दि. १५) पुन्हा न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी बंडूने न्यायालयात पोलिसांनी दिलेल्या धमकीचे कथन केले. मुलगा कृष्णा आंदेकर याची माहिती दे, नाहीतर त्याला थेट गोळ्या झाडू अशी धमकी दिल्याचा दावा बंडू आंदेकर याने न्यायालयात केला होता. मात्र तपास अधिकार्‍यांनी न्यायालयासमोर आरोपीने केलेले सर्व आरोप फेटाळले होते. दरम्यान, पोलीस आरोपी कृष्णाचा एन्काउंटर करणार याची चर्चा वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे घाबरलेल्या कृष्णाने समर्थ पोलीस ठाणे गाठून शरणागती पत्करल्याचे बोलले जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×