न्हेगारी रोखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करावी
marathinews24.com
पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर आहे. गेल्या तीन दिवसांत दोन खून झाले आहेत. कोंढव्यातील खूनाची घटना ताजी असतानाच बाजीराव रस्त्यावर मध्यवर्ती भागात अल्पवयीनाचा खून झाला. या घटनांमुळे सर्वसामान्य नागरीक भीतीच्या छायेखाली वावरत आहे. त्यामुळे वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे.
पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याची ६ नोव्हेंबरपर्यंत संधी – सविस्तर बातमी
पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावर भरदिवसा टोळक्याने अल्पवयीनावर कोयत्याने वार करून खून केला आहे. मागील तीन दिवसांत दोन खून झाले आहेत.त्यामुळे पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृह खात्याने प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की, कृपया आपण शहरांतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सद्वारे केली आहे.




















