Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याची ६ नोव्हेंबरपर्यंत संधी

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याची ६ नोव्हेंबरपर्यंत संधी

नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

marathinews24.com

पुणे – पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत ६ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणीची संधी उपलब्ध असून सर्व पात्र पदवीधर व शिक्षकांनी नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कमी उमेदवार असलेल्या माध्यमांसाठी परीक्षा केंद्र निश्चित – सविस्तर बातमी 

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांशी संवाद साधून मतदार नोंदणीच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी विभागातील पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागस्तरीय अधिकारी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी सुरू आहे. मतदार नोंदणीसाठी ऑफलाईन सोबतच भारत निवडणूक आयोगाकडून https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सन २०२६ मध्ये पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते मतदार नोंदणीचे काम करीत आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत यापूर्वीच्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयादीत नाव समाविष्ट असले तरी पुन्हा नव्याने पात्र मतदारांचे नाव यादीत समाविष्ट करणे आवश्यक आहे, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×