Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

“महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” चे शुक्रवारी आयोजन

उद्योग संचालनालय, उद्योग, उर्जा व कामगार विभागामार्फत "महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६" एकदिवशी कार्यशाळा

अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – उद्योग संचालनालय, उद्योग, उर्जा व कामगार विभागामार्फत “महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” एकदिवशी कार्यशाळा शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता सुभाष अंबिके क्लब हाऊस, इलेक्ट्रॉनिक को-ऑप इंडस्ट्रियल इस्टेट लि. पुणे सातारा रोड, पर्वती पुणे येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे.

उद्योगांशी निगडित समस्यांचे वेळेत निराकरण करा – निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम – सविस्तर बातमी 

या कार्यशाळेत सूक्ष्म, लघू, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकरी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादन, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बॅकां आदीं घटकांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचा अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×